मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म भरताना ही चूक केली तर 1500 रुपए नाही मिळणार

नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म भरन्यास आता सुरुवात झालेली आहे. बरेच जन Narishakti Doot या एप वरुन अर्ज देखील करत आहेत पण त्यांना फॉर्म भरताना खूप अडचनींना सामोरे जावे लागत आहे.

फॉर्म भरताना एक जरी चूक झाली तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही म्हणजेच तुम्हाला 1500 रुपए मिलणार नाही. त्यामुले फॉर्म व्यवस्थित लक्ष देऊन भरायचा आहे. त्यांच्याकडून झालेल्या चुका तुम्ही करू नये म्हणून हे आर्टिकल पूर्ण वाचा आणि शेयर सुद्धा करा.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या चुका टाळा

1. सर्वात महत्वाचे म्हणजे फॉर्म भरण्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रे काडुन घ्या. या योजनेसाठी लागणारे documents खाली दिले आहेत, सर्वप्रथम ते जमा करा व त्यानंतर फॉर्म भरायला घ्या.

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाला सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र/ पिवले किंवा केशरी रेशनकार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • बैंक पासबुक-
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे
  • अर्जदाराचा फोटो

2. हमीपत्र हे तुम्हाला शासनाने दिलेलेच डाउनलोड करायचे आहे व त्याची प्रिन्ट काडुन त्यात स्थळ, दिनांक, अर्जदाराची सही व नाव टाकून अपलोड करायचे आहे.

3. प्रोफाइल अपडेट करते वेली तुम्हाला नारीशक्ती प्रकार सिलेक्ट करावा लागतो. त्यात बरेच ऑप्शन ही दिलेले आहेत, तर तुम्ही ज्या ऑप्शन मध्ये फिट बसता तोच पर्याय निवडा.

4. तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव हे आधार कार्ड प्रमाणे च टाकायचे आहे आणि जन्म दिनांक ही सुद्धा आधार कार्ड किंवा जन्माच्या दाखल्या प्रमाणे टाकायची आहे.

5. वैवाहिक स्थिती या पर्यायामध्ये तुम्ही जर विवाहित हा पर्याय निवडला तर महिलेचे लग्नापुर्वीचे नाव हे टाकावे लागेल. आणि जर अविवाहित हा पर्याय निवडला तर तिथे आता आहे तेच नाव टाकायचे आहे.

6. बँकेची माहिती टाकताना तुमचा अकाउंट नंबर नीट चेक करून टाका. तसेच IFSC कोड व बँकेचे नाव देखील बरोबर चेक करून टाका. तुमचे बैंक खाते हे आधार कार्ड ला लिंक करून घ्या.

7. अर्जदाराचा फोटो या पर्यायामध्ये तुम्हाला तुमचा लाइव फोटो घ्यायचा आहे म्हणजे फॉर्म भरताना डायरेक्ट मोबाईल वरुन फोटो काढ़ायचा आहे.

वर सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरण्यापूर्वी सर्व माहिती व्यवस्थित वाचून घ्या आणि फॉर्म कसा भरायचा हे आधी बघून घ्या. त्यासाठी तुम्ही खाली दिलेले आर्टिकल नक्कीच वाचा.

लाडकी बहिण योजना Online apply Marathi | [Rs.1500] Mazi Ladki Bahin Yojana Nari Shakti Doot App 2024

तसेच फॉर्म भरताना तुम्हाला काही problem येत असेल तर तुम्ही आमचा Whatsapp ग्रुप जॉइन करून घ्या. त्यावर आम्ही योजने संबंधी सर्व अपडेट टाकात राहतो. ही माहिती तुमच्या मित्र व नातेवाईकांना जरूर शेयर करा.

Leave a Comment

error: Content is protected !!