लाडका भाऊ योजना Online Apply 2024

मित्रांनो, सरकारने माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता राज्यातील तरुणांसाठी एक नवी योजना आणली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यालाच लाडका भाऊ योजना असे म्हंटले जात आहे.

महाराष्ट्र राज्याच्या युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सरकारने “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील तरुणांना रोजगारक्षम बनवणे आणि त्यांना व्यावहारिक कामाचा अनुभव देणे हा आहे.

या योजनेबद्दल सारी माहिती आपण पुढे बघनार आहोत.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना का चालू केली?

महाराष्ट्रात दरवर्षी मोठ्या संख्येने युवक आपले शिक्षण पूर्ण करून नोकरी किंवा व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतात. परंतु, अनेकांना व्यावहारिक अनुभवाच्या कमतरतेमुळे नोकरी मिळवण्यात अडचणी येतात. या समस्येवर मात करण्यासाठी आणि युवकांच्या कौशल्य विकासासाठी राज्य सरकारने ही योजना आखली आहे.

या योजनेसाठी सरकारने जी वेबसाईट तयार केली आहे तिच्या माध्यमातून इच्छुक उमेदवार आणि रोजगार देणारे उद्योजक जोडले जातील.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:

1. कालावधी: फक्त 6 महिनेच पैसे मिळणार
2. वयाची अट: 18 ते 35 वयोगटातील महाराष्ट्राचे रहिवासी
3. शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका, पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक
4. विद्यावेतन:

शैक्षणिक अर्हताविद्यावेतन रु.
12वी उत्तीर्णरु. 6,000/- प्रति महिना
आयटीआय/पदविकारु. 8,000/- प्रति महिना
पदवी/पदव्युत्तररु. 10,000/- प्रति महिना

5 प्रशिक्षण स्थळ: खाजगी कंपन्या, स्टार्टअप्स, सरकारी कार्यालये, सहकारी संस्था इत्यादी

मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना पात्रता:

  • वय: 18 ते 35 वर्षे
  • शैक्षणिक अर्हता: किमान 12वी उत्तीर्ण
  • अधिवास: महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक
  • आधार कार्ड: नोंदणीकृत आधार कार्ड असणे आवश्यक
  • बँक खाते: आधार कार्ड बरोबर लिंक असलेले बँक खाते असणे आवश्यक

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट:

1. युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव देणे
2. त्यांच्या कौशल्याचा विकास करणे
3. रोजगारक्षमता वाढविणे
4. उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे
5. बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे

हेही वाचा: लाडकी बहिण योजना Online apply Marathi | Mazi Ladki Bahin Yojana Nari Shakti Doot App 2024

माझा लाडका भाऊ योजना अर्ज कसा करायचा?

1. ऑनलाइन नोंदणी: उमेदवारांनी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर rojgar.mahaswayam.gov.in नोंदणी करणे आवश्यक आहे.
2. प्रोफाइल तयार करणे: व्यक्तिगत माहिती, शैक्षणिक पात्रता, कौशल्ये इत्यादींची माहिती भरणे.
3. आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे: शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी.
4. प्रशिक्षण क्षेत्राची निवड: उमेदवार त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण क्षेत्र निवडू शकतात.
5. मंजुरी आणि नियुक्ती: योग्य उमेदवारांची निवड केली जाईल आणि त्यांना प्रशिक्षणासाठी नियुक्त केले जाईल.

लाडका भाऊ लाभार्थ्यांसाठी फायदे:

१. प्रत्यक्ष कामाचा अनुभव: ६ महिन्यांच्या प्रशिक्षणात उमेदवारांना वास्तविक कार्य वातावरणात काम करण्याची संधी मिळेल.
२. विद्यावेतन: प्रशिक्षणार्थींना दरमहा विद्यावेतन दिले जाईल, जे त्यांच्या आर्थिक गरजा भागवण्यास मदत करेल.
३. कौशल्य विकास: विविध क्षेत्रांतील प्रशिक्षणामुळे उमेदवारांचे कौशल्य वाढेल.
४. नेटवर्किंग: उद्योग जगतातील व्यक्तींशी संपर्क साधण्याची संधी मिळेल.
५. करिअर मार्गदर्शन: अनुभवी व्यावसायिकांकडून मार्गदर्शन मिळेल.
६. रोजगाराच्या संधी: प्रशिक्षणानंतर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
७. आत्मविश्वास वाढ: प्रत्यक्ष कामाच्या अनुभवामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास वाढेल.

सहभागी संस्थांसाठी फायदे:

१. कुशल मनुष्यबळ: प्रशिक्षित आणि उत्साही युवकांची उपलब्धता.
२. खर्चात बचत: नवीन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरील खर्च कमी होईल.
३. संभाव्य कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन: ६ महिन्यांच्या कालावधीत उमेदवारांच्या कौशल्याचे मूल्यमापन करता येईल.
४. सामाजिक जबाबदारी: युवकांच्या कौशल्य विकासात योगदान देऊन सामाजिक जबाबदारी पार पाडता येईल.
५. नवीन कल्पना: तरुण प्रशिक्षणार्थींकडून नवीन आणि ताज्या कल्पना मिळू शकतात.

योजनेची अंमलबजावणी:

१. राज्यस्तरीय समिती: योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक राज्यस्तरीय समिती स्थापन केली जाईल.
२. जिल्हास्तरीय समिती: प्रत्येक जिल्ह्यात एक समिती योजनेचे संनियंत्रण करेल.
३. ऑनलाइन पोर्टल: संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होईल.
४. नोडल एजन्सी: कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता संचालनालय ही नोडल एजन्सी असेल.
५. मासिक आढावा: योजनेच्या प्रगतीचा दरमहा आढावा घेतला जाईल.

हेही वाचा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना फॉर्म भरताना ही चूक केली तर 1500 रुपए नाही मिळणार

Conclusion:

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही महाराष्ट्राच्या युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेमुळे युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, त्यांचे कौशल्य वाढेल आणि त्यांची रोजगारक्षमता वाढेल. याच बरोबर, उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल.

ही माहिती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहचली पाहिजे जेने करून त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल, त्यासाठी ह्या लेखाला आपल्या मित्रपरिवारासोबत शेयर नक्की करा आणि आमचा Whatsapp ग्रुप पण जॉइन करा त्यावर आम्ही नवीन योजना, सरकारचे नवीन updates टाकत असतो.

Leave a Comment

error: Content is protected !!