लाडकी बहिण योजना Online apply Marathi | [Rs.1500] Mazi Ladki Bahin Yojana Nari Shakti Doot App 2024

नमस्कार मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपए देण्यात येणार आहे. सर्व महिलांना या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी सरकारने काही नवीन बदल ही केले आहेत.

सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 अगस्त 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच वय, उत्पन्न, शेती आणि काही documents मध्ये ही बदल करण्यात आलेला आहे.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरावा

मित्रांनो, तुम्ही आता तुमच्या मोबाईल वरुन घर बसल्या या योजनेसाठी अर्ज करू शकता. Narishakti Doot या ॲप वर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसाठी एकदम सहज Apply करू शकता.

Ladki Bahini yojana Online apply in Marathi

आम्ही step by step सर्व माहिती खाली दिलेली आहे, तुम्हाला फक्त त्या नुसार फॉर्म भरायचा आहे.

Step 1: सर्वात पहिले तुम्हाला Narishakti Doot हे ॲप प्लेस्टोर मधून आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल. यासाठी तुम्हाला Play Store वर जाऊन Narishakti Doot ॲप असे सर्च करावे लागेल. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा तुम्ही नारीशक्ती ॲप डायरेक्ट डाउनलोड करू शकतात.

Step 2: आता नीट लक्ष देऊन पुढच्या सर्व स्टेप्स फॉलो करा. ॲप इंस्टॉल केल्या नंतर तुम्हाला लॉगिन कराव लागेल, त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. इथे तुमचा मोबाईल नंबर टाकून खाली Accept terms & condition च्या बॉक्स वर क्लिक करून Login बटनावर क्लिक करा.

Step 3: आता तुमच्या मोबाईल नंबर वर 4 डिजिट चा एक OTP येईल, तो टाकून Verify OTP बटनावर क्लिक करा.

Step 4: त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल अपूर्ण आहे असा एक मैसेज तुमच्या मोबाईल स्क्रीन वर दिसेल, तर तुम्हाला ‘आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा‘ यावर क्लिक करायचे आहे. (खालच्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे).

Step 5: पुढे तुम्हाला प्रोफाइल अपडेट करायची आहे तर तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे. त्यानंतर Email ID असेल तर टाका नाहीतर नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर जिल्हातालुका सिलेक्ट करायचा आहे आणि नारीशक्ती प्रकार सिलेक्ट करायचा आहे. यात तुम्हाला पुढील ऑप्शन दिसतील-

  • सामान्य महिला
  • समूह संसाधन व्यक्ति(CRP)
  • बचतगट अध्यक्ष
  • बचतगट सचिव
  • बचतगट सचिव
  • गृहिणी
  • अंगनवाड़ी सेविका/ मदतनिस
  • ग्रामसेवक
  • वार्ड अधिकारी
  • सेतू

तुम्ही कोण आहात ते सिलेक्ट करून अपडेट करा या बटनावर क्लिक करायचे आहे.

Step 6: त्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला खाली नारीशक्ती दूत चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. स्क्रीन च्या मध्येभागी पहिलाच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना‘ हा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

Step 7: ह्या नंतर जो फॉर्म ओपन होईल, तो खूप काळजीपूर्वक भरायचा आहे.

1. महिलेचे संपूर्ण नाव– येथे आधार कार्ड वर जे नाव आहे तसेच पूर्ण नाव टाइप करायचे आहे.
2. पतीचे/ वडिलांचे नाव– महिला जर विवाहित असेल तर तिच्या पतीचे नाव टाकायचे आणि जर अविवाहित असेल तर तिच्या वडिलांचे नाव टाकायचे.
3. जन्म दिनांक– दिनांक/महिना/वर्ष- येथे महिलेचा जन्म दिनांक निवडायचा आहे.

अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती

4. जन्माचे टिकाण– यात तुम्हाला जिल्हा, गाव/ शहर, ग्रामपंचायत/नगरपंचयत/नगरपालिका/महानगरपालिका व पिनकोड ही सर्व माहिती भरायची आहे.
5. मोबाईल क्रमांक– महिलेचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.
6. आधार क्रमांक– येथे आधार कार्ड वरील नंबर टाकायचा आहे.

7. शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणार आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का? – इथे होय किंवा नाही असे दोन ऑप्शन आहेत, घेत असाल तर होय सिलेक्ट करा अन्यथा नाही सिलेक्ट करा.

8. वैवाहिक स्थिति– यात पुढील पैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा

  • अविवाहित
  • विवाहित
  • विधवा
  • परित्यकत्या
  • निराधार
  • घटस्फोटीत

जर विवाहित सिलेक्ट केले तर महिलेचे लग्नापुर्वीचे नाव टाकावे लागेल आणि अविवाहित सिलेक्ट केले तर आता आहे तेच नाव टाका.

अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील

  • बँकेचे नाव- तुमचे खाते असलेल्या बँकेचे नाव इथे लिहा. कोणत्याही बँकेचे नाव तुम्ही देऊ शकता.
  • बैंक खाते धारकचे नाव- पासबुक वर असलेले तुमचे नाव इथे लिहा.
  • बैंक खाते क्रमांक- नीट खात्री करून व्यवस्थित बैंक अकाउंट नंबर टाका.
  • IFSC कोड- बँकेचा IFSC कोड टाका.
  • आपला आधार क्रमांक बैंक खात्याला जोडले आहे काय? – होय/नाही (जोडले नसेल तर लगेच जोडून घ्या)

खालील सर्व कागदपत्रे upload करण्यात यावी

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र/ शाला सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र/ पिवले किंवा केशरी रेशनकार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र– हमीपत्र तुम्ही आमच्या Whatspp ग्रुप ला जॉइन करून घेऊ शकतात. यात स्थल, दिनांक, अर्जदाराची सही व नाव टाकून अपलोड करायचे आहे.
  • बैंक पासबुक-
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे
  • अर्जदाराचा फोटो- येथे महिलेचा लाइव फोटो घ्यायचा आहे म्हणजे फॉर्म भरताना डायरेक्ट मोबाईल वरुन फोटो काढ़ायचा आहे.

सर्व documents अपलोड केल्यावर खाली फॉर्म सबमिट करा असा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला मोबाईल वर एक 4 डिजिट चा OTP येईल, तो टाकून verify करा.

त्यानंतर तुम्हाला Survey has been verified असा मैसेज स्क्रीन वर येईल म्हणजेच तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. अश्या प्रकारे तुम्ही घर बसल्या मोबाईल वरुन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेचा फॉर्म भरू शकता.

आपल्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना ही माहिती शेयर करा आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने बद्दल नवीन माहिती साठी किंवा फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम्स येत असेल तर आमचा Whatsapp ग्रुप जॉइन करा.

Also Read,
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024

error: Content is protected !!